नांदुरपठार : प्रतिनिधी
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम आणि एकत्र येण्याचा सोहळा. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी रविंद्रशेठ राजदेव मित्रमंडळाच्या वतीने यंदा भव्य “दिवाळी भाऊबीज उत्सव” मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण सोनिया रविंद्र राजदेव आणि रविंद्रशेठ राजदेव यांनी सर्व नागरिकांना दिले असून, समाजातील सर्व बांधवांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून, दिवसभर विविध उपक्रम, भेटवस्तूंचे वाटप आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे, लोकनेते खासदार नीलेश लंके या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आलेल्यांसाठी विशेष आकर्षण म्हणून भगिनींसाठी खास भेटवस्तूंची सोय करण्यात आली आहे. तसेच उपस्थित पाहुण्यांसाठी भजी-जिलेबीचे विशेष आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक स्नेह आणि आपुलकीने भरलेला हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
दिवाळीचा आनंद सामूहिकरित्या साजरा करून समाजातील एकोपा, प्रेमभावना आणि स्नेहबंध वृद्धिंगत करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
रविंद्रशेठ राजदेव मित्रमंडळाच्या या उपक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत.
“आपल्या सर्वांनी कुटुंबासह या उत्सवात सहभागी व्हावे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा,” असे आवाहन आयोजक सोनिया रविंद्र राजदेव आणि रविंद्रशेठ राजदेव यांनी केले आहे.


