Saturday, December 21, 2024

Epaper

spot_img

मोठी बातमी! जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

जपानला (Japan) मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Germany 3rd largest Economy)  बनली आहे. 

Japan Economy Recession : जर्मनीच्या (Germany) दृष्टीनं सर्वात दिलासादायक बातमी समोर आली आहे. जपानला (Japan) मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Germany 3rd largest Economy)  बनली आहे. 

दरम्यान, जपानला मागे टाकून जर्मनी पुढे गेली आहे ही भारतासाठी मोठी संधी. जपानचा जीडीपी आता 4.2 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. तर जर्मनीने त्याला मागे टाकून नंबर-3 स्थान गाठले आहे, आकारमान जर्मनीचा जीडीपी 4.5 ट्रिलियन डॉलर आहे. दरम्यान, जपानी अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भविष्यात भारत जपानला मागे टाकण्याची शक्यता आहे.

अनेक देशांच्या जीडीपीच्या आकडेवारीत ही बाब समोर

आज अनेक देशांच्या जीडीपीच्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. गेल्या दोन तिमाहीत जपानच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) घसरण झाली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. यासोबतच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत येनचे मूल्य घसरल्याने परिस्थितीही बिकट झाली आहे. जपान मंदीच्या गर्तेत आहे. जपानच्या जीडीपीच्या घसरणीमुळे हा देश आता मंदीच्या गर्तेत (Japan Recession) आहे. त्याचा परिणाम जपानने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान गमावले आहे. जपानचा जीडीपी आता 4.2 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे, तर नंबर-३ वर पोहोचलेल्या जर्मनीच्या जीडीपीचा आकार त्याला मागे टाकत 4.5 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत, जपानचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वार्षिक आधारावर 0.4 टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने असा अंदाज वर्तवला होता की अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्यास जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, तर जपान मागे पडेल.

युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला गेल्या वर्षी काही काळ सौम्य मंदी आली होती. जर्मनीचा जीडीपी पूर्ण वर्षाच्या आधारावर 2023 मध्ये 0.3 टक्क्यांनी कमी झाला. जपानच्या अर्थव्यवस्थेने गेल्या वर्षभरात 1.9 टक्के वाढ नोंदवली. यानंतरही जीडीपीच्या आकारमानात जर्मनीने जपानला मागे टाकले आहे. आकडेवारीनुसार, जपानच्या अर्थव्यवस्थेचा आकार 4.2 ट्रिलियन डॉलर्स आहे, तर जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा आकार 4.5 ट्रिलियन डॉलर्स आहे.

अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश

सध्या, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. ज्याचा आकार सुमारे 27 ट्रिलियन डॉलर्स आहे. सुमारे 17 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान ही अनेक वर्षापासून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. पण आता चौथ्या स्थानावर घसरली आहे. जर्मनीने एका स्थानावर झेप घेतली असून आता चौथ्याऐवजी तिसऱ्या स्थानावर आहे. सुमारे 3.75 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह भारत पाचव्या स्थानावर आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी