Wednesday, September 18, 2024

Epaper

spot_img

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते अ‍ॅप…’

 मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत.

पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

पेटीएमचे संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम युजर्सना विश्वास दिला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले पेटीएम अ‍ॅप त्यानंतर देखील कार्यरत राहणार आहे.. विजय शेखर शर्मा यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तुमचे आवडते ॲप कार्यरत आहे आणि 29 फेब्रुवारीनंतर देखील कार्यरत राहिल. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी आणि प्रत्येक पेटीएम टीम सदस्य तुम्हाला सलाम करतो, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. प्रत्‍येक आव्‍हानावर पर्याय असतो आणि आम्‍ही सर्व कायद्याचे पालन करुन देशातील आमच्‍या ग्राहकांना सेवा देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. भारताला आर्थिक सेवा पुरवताना त्यामध्ये नाविन्‍यता आणि सर्वसमावेशकता असेल. ज्यामध्ये पेटीएम युजर्स सर्वात मोठे चॅम्पियन ठरतील, असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

आरबीआयच्‍या निर्देशानंतर पेटीएम ग्राहकांमधील चिंता वाढू लागली आहे. अ‍ॅप सुरु राहणार की बंद होणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर युजर्सना पुढील निर्देश देण्यात आले आहेत.

पेटीएमद्वारे देण्‍यात येणाऱ्या बहुतांश सेवा विविध बँकांसोबत (सहयोगी बँकासह) सहयोगाने असल्‍यामुळे पेटीएम आणि त्‍यांच्‍या सेवा 29 फेब्रुवारीनंतर देखील कार्यरत राहतील.

पेटीएम यूजर्सचे बचत खाती, वॉलेट्स, फास्‍टटॅग्‍स आणि एनसीएमसी खात्‍यांमधील जमा रकमेवर काहीच परिणाम होणार नाही आणि ते विद्यमान शिल्‍लक रकमेचा वापर करणे सुरू ठेवू शकतात.

पेटीएमच्‍या सहयोगी बँकेबाबत नुकतेच आरबीआयने सादर केलेल्‍या निर्देशांचा पेटीएम मनी लिमिटेडच्‍या (पीएमएल) कार्यसंचालनांवर किंवा इक्विटी, म्‍युच्‍युअल फंड किंवा एनपीएसमधील ग्राहकांच्‍या गुंतवणूकांवर कोणताच परिणाम होणार नाही.

कर्ज वितरण आणि विमा वितरण अशा सेवांवर परिणाम होणार नाही. या सेवा नियमित कार्यरत राहतील.

पेटीएमच्‍या ऑफलाइन पेमेंट नेटवर्क ऑफरिंग्‍ज जसे पेटीएम क्‍यूआर, पेटीएम साऊंडबॉक्‍स, पेटीएम कार्ड मशिन नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. यामध्ये नवीन ऑफलाइन मर्चंट्सना देखील ऑनबोर्ड करता येऊ शकते.

पेटीएम अ‍ॅपवरील मोबाइल रिचार्जेस्, सबस्क्रिप्‍शन्‍स आणि इतर रिकरिंग पेमेंट्स सुलभपणे कार्यरत राहतील, असे आवाहनही पेटीएमकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी