पारनेर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून धोत्रे व परिसराला भेडसावणारी वीजेची समस्या अखेर दूर झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांतून टाकळी ढोकेश्वर ते धोत्रे या ९० पोलच्या लाईनचे काम पुर्ण झाले असून हा प्रश्न आता मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची वातावरण आहे.
वीजेची समस्या दुर करण्यासंदर्भात धोत्रे येथील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन झावरे पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आरडीएसएस योजनेअंतर्गत टाकळी ढोकेश्वर ते धोत्रे हे ९० पोलच्या लाईनचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक कोटी रूपयांचा निधी मंजुर केला होता.
हे काम मार्गी लावण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न माग लावल्याबद्दल धोत्रे ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले.
काम पुर्ण झाल्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी जालिंदर भांड, विनायक भांड, कुंडलिक भांड, पंढरीनाथ तागड, शेखर भांड, शरद गवते, नामदेव भांड, दिलीप गवते, जगन्नाथ बनसोडे, संदीप भांड, भाऊसाहेब राहिंज यांच्यासह ग्रामस्थांनी वीज केंद्रास भेट देत कामाची पाहणी केली.
तीन गावांच्या वीजेचा प्रश्न मार्गी
निधी मंजुरीनंतर काम सुरू होऊन ९० पोलच्या लाईनचे काम नुकतेच पुर्ण होऊन वीजेची जोडणीही देण्यात आली. त्यामुळे काकणेवाडी, ढोकी या गावांच्या वीजेवरील अतिरिक्त भार पुर्णतः कमी होऊन धोत्रे गावासह काकणेवाडी व धोत्रे या गावांच्या वीजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.