Wednesday, September 18, 2024

Epaper

spot_img

Ram Mandir UAE : PM मोदींनी अबुधाबीत राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘कुराण’ चा केला उल्लेख, काय म्हणाले पंतप्रधान जाणून घ्या

Ram Mandir UAE : UAE मधील पहिल्या मंदिराची स्थापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. अबुधाबीतील (Abu Dhabi) पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुराणचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हे मंदिर जगाच्या विविधतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि अयोध्येतील राममंदिराबाबत देखील उपस्थितांना सांगितले.  

पंतप्रधान मोदींकडून कुराणचा उल्लेख

दुबई-अबू धाबीतील हे मंदिर शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ 27 एकर जागेवर सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मंदिराच्या भिंतींवर केवळ हिंदू धर्माचे प्रतीकच नाही तर इजिप्शियन चित्रलिपी आणि कुराणातील कथा देखील कोरल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, हे मंदिर धर्मांमधील सद्भावना आणि जगाच्या एकतेचे प्रतीक बनेल. तसेच हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नसून मानवतेच्या समान वारसाचे प्रतीक आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी