Saturday, April 19, 2025

Epaper

spot_img

पारनेर तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेच्या चेअरमनला ठोकल्या बेड्या ; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

अहिल्यानगर : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक असलेला गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था व गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था या दोन सहकारी संस्थांचा सर्वेसर्वा बाजीराव पानमंद राजे शिवाजी पतसंस्थंच्या लफड्यातही अडकला असून नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याला बेडया ठोकल्या.

पुणे जिल्ह्यातील रिंग रोड सभोवताली जमीन खरेदी करून त्यात मलिदा मिळविण्याच्या हेतूने राजे शिवाजी पतसंस्थेसह काही पतसंस्थांच्या म्होरक्यांनी मोठी गुंतवणूक केली. बाजीराव पानमंद यानेही कोणत्याही संचालकाची अथवा प्रशासनातील अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मोठी रक्कम राजे शिवाजी पतसंस्थेत गुंतविली होती.

राजे शिवाजी पतसंस्थेचा सर्वेसर्वा ॲड. आझाद ठुबे सध्या न्यायालयीन कोठडीत असून राजे शिवाजी पतसंस्थेतील गैरप्रकाराप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत बाजीराव पानमंद याचा सहभाग असल्याचे पुढे आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी पहाटेच त्याच्या घरून त्यास अटक केली.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी