गाजदीपूर : प्रतिनिधी
कोणतेही पद अथवा सत्ता नसतानाही जनतेची सार्वजनिक कामाची मागणी येताच ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोडविण्याची जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची ख्याती आहे.याचा प्रत्यय आज गाजदीपूरकरांना आला.ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी करताच तो प्रश्न पाटलांनी चुटकीसरशी सोडविला.
पारनेर तालुक्यातील अतीदुर्गम अशा गाजदीपूर या प्रामुख्याने धनगर समाज मोठ्या प्रमाणात रहात असुन जगाच्या मुख्य प्रवाह पासून हे गाव तसे दूरचे आहे.यापुर्वी या गाजदीपूरला जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना सुजित झावरे पाटील यांनी वन खात्यातून २ कि.मी.रस्ता, शाळा खोल्या, पाणी योजना इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
आज एका दशक्रिया विधी प्रसंगी गेल्यानंतर “पाटील अजून थोडा रस्ता” अशी मागणी केल्या नंतर तिथेच थांबून अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन नवीन रस्त्याची पाहणी केली. व तो येता एक ते दीड महिन्यात पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. उपस्थितीत असलेल्या ग्रामस्थानी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले.यावेळी शाखा अभियंता किरण जाधव व गाजदीपूर वडगाव सावताळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.