पारनेर : प्रतिनिधी
आगामी पाच वर्षांत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी पारनेरच्या इंदिरा विकास भवन येथे सोडतीद्वारे जाहिर करण्यात आले. निघोज, भाळवणी, रांजणगांव मशिद, पिंपळनेर आदी प्रमुख गावांचे सरपंचपद आरक्षित झाल्याने भावी सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला आहे !
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकांसाठी सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहिर करण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ६, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३१ गावांचे सरपंचपदासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६९ जागा आहेत. शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी आरक्षित व सर्वसाधारण जागांचे पुरूष व स्त्री प्रवर्गाचे आरक्षण जाहिर करण्यात येणार आहे.
▪️अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण
पिंपळनेर, माळकुप, रांजणगांव मशिद, अस्तगांव, जामगांव, किन्ही.
▪️अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण
म्हसे खुर्द, गुणोरे, भाळवणी, निघोज, लोणीहवेली, वडगांव आमली, म्हसणे व म्हस्केवाडी.
▪️नागरिकांचा मागास प्रवर्ग
राळेगण थेरपाळ, जातेगांव, बाबुर्डी, चोंभूत, गारगुंडी, जाधववाडी, काळकुप, खडकवाडी, कुरूंद, पळवे बुद्रुक, पठारवाडी, पुणेवाडी, राळेगणसिध्दी, रायतळे, वाघुंडे खुर्द, विरोली, यादववाडी, गारखिंडी, शेरी कासारे, जवळा, वडझिरे, अपधूप, वडूले, पळशी, सुपा, कारेगांव, वनकुटे, पाडळी रांजणगांव, गटेवाडी, भोंद्रे, ढोकी.
▪️सर्वसाधारण प्रवर्ग
अक्कलवाडी, अळकुटी, बाभुळवाडे, भांडगांव, भोयरेगांगर्डा, चिंचोली, दैठणे गुंजाळ, दरोडी, देसवडे, देवीभोयरे, ढवळपुरी, धोत्रे बु., डिकसळ, गांजीभोयरे, घाणेगांव, गोरेगांव, हंगा, हत्तलखिंडी, हिवरे कोरडा, कडूस, काकणेवाडी, कळस, कान्हूरपठार, करंदी, कर्जुले हर्या, कासारे, काताळवेढा, कोहोकडी, लोणीमावळा, मांडवे खुर्द, मावळेवाडी, म्हसोबा झाप, मुंगशी, नांदूरपठार, नारायणगव्हाण, पाडळीदर्या, पळसपुर, पानोली, पिंपळगांव रोठा, पिंपळगांव तुर्क, पिंपरीगवळी, पिंपरी जलसेन, पिंपरी पठार, पोखरी, रांधे, रेनवडी, रूईछत्रपती, सांगवी सुर्या, सारोळा आडवाई, सावरगांव, शहाजापुर, शिरापुर, सिध्देश्वरवाडी, टाकळी ढोकेश्वर, तिखोल, वडगांव दर्या, वडगांव सावताळ, वडनेर बुद्रुक, वडनेर हवेली, वाघुंडे बुद्रुक, वाळवणे, वारणवाडी, वासुंदे, वेसदरे, वाडेगव्हाण, पाबळ, पाडळीआळे, पळवे खुर्द.